प्रिय शोण, लिहिण्यास कारण की....
आज जेव्हा मी तुझे नाव टॅटू करुन घेतले, माझे मन जुन्या आठवणीत गेले. अगदी पहिल्या दिवशी जन्मल्या जन्मल्या जेव्हा मी तुला बघितले, मला माझाच वेगळा अभिमान वाटला, लोकांना आपल्या मुलाचे नाव ठेवायला शोधायला बरेच दिवस लागतात, तुझे नाव तुझ्या जन्मायच्या अगोदरच मी माझ्या मनात गोंदवुन ठेवले होते, आणि आज तेच माझ्या मानेवर मणक्याच्या सुरुवातीस गोंदवुन (टॅटू) करून घेतले.
मला ते टॅटू करताना दुखले का असा मुर्ख प्रश्ण बऱ्याच जणानी विचारला ....खरे तर तुझ्या आठवणीतच फक्त दुखवण्याचे सामर्थ्य आहे रे, बाकी कशातच ते नाही..
तसाही जीवनाचा इथपर्यंतचा प्रवास विशेष सुखदायी नव्हता. अजुनही तुझा बाबा तुझ्यासारखीच काल्पनिक स्वप्ने बघत मोठा होत आहे रे...
तुझे पहिले पाऊल, तुझा पहिला kiss, तुझी मिठी...अश्या बऱ्याच आठवणी अजुनही माझ्या डोळ्यात दाटुन गर्दी करतात रे... तुझ्याशिवाय मी नाही जगु शकत असे स्वतःलाच समजावत जगतोय... माझ्या नशिबाचे पण काय नशिब आहे... हा हा हा... असो...
सकाळी सकाळी तुझ्या श्वासाला माझ्या मिठीत अनुभवत मी नेहमी माझे डोळे उघडायचो, स्वतःच्या छोटुकल्या DNA ला मिठीत अनुभवण्यासारखे सुख नाही रे... संध्याकाळी घरी आल्यावर, तुझी एक smile, एक मिठी दिवसभराच्या सगळया काळज्यांना तिलांजली द्यायच्या... तुझे अश्रुही कधी कधी मला अशक्त करायचे...
तु या जगात पहिला जीभेचा स्पर्श ज्या चांदीच्या चमच्याला केलास तो चमचा, तुझे पहीले चांदीचे पैंजण अजुनहि माझ्या ऑफिसच्या बॅगेत मी साभांळून ठेवलय... जीवनाच्या प्रत्येक निर्णयात त्यांची मदत मी घेत आलोय...
Motivation is all you are to me. तुझे प्रेमच मला थोडेसे सुखद क्षण देतात, तुला येवढ्याश्या छोट्या वयात प्रेमाचा कदाचित अर्थ कळत नसेल, पण त्याच छोट्याश्या शब्दामुळे आज तुझा बाबा प्रत्येक संकटासमोर धीटपणे उभा आहे. मला माहीत आहे की, तु मला कधीच मिळणार नाही आहेस. पण तु सदैव माझा Spine आहेस आणि राहशील.
कोण म्हणतं तु नाहीस माझ्याकडे, आता तर मरताना पण तु माझाच असशील. कोणीही तुला मिटवू शकणार नाही...
Saturday, May 16, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment