प्रिय शोण,
आज काय मस्त पाऊस पडला रे इकडे. आज रविवार होता, दिवस तसा झोपूनच काढला. संध्याकाळी फिरायला गेलो तर मस्त पाऊस सुरू झाला. तुझी आठवण आली. अमेरिकेत असताना पहिल्यांदा तु शॉवर बघितलास आणि त्यालाच पाऊस पाऊस म्हणत रडायला लागलास. अजुनही तु पावसाला घाबरतोस का रे?
लहानपणी मी मनसोक्त पावसात भिजलोय, होड्या बनवल्यात, येरे येरे पावसा म्हणत बेडकाचा आवाजसुध्दा काढलाय. सांग सांग भोलानाथ करत नंदीबैलासारखी मानसुध्दा हलवलीय. आता असतास तर परत त्या आठवणींना भिजता आले असते... असो.
कधी भिजलास तर बाबाची आठवण काढ रे... न विसरता...
इकडचा पाऊस थांबतच नाहीय, Key Board पण भिजलाय.
Sunday, May 17, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment